महावितरणच्या बारा लाख ग्राहकांचा ऑनलाइन बिलभरणा

0

202 कोटी 7 लाख रुपयांची ऑनलाइन वसूली

पुणे : महावितरण प्रशासनाला शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील वीज ग्राहकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ऑनलाइन पध्दतीने वीजबिल भरणार्‍या ग्राहकांची संख्या तब्बल 12 लाखांवर पोहचली आहे. महावितरणच्या संकेतस्थळाबरोबरच मोबाइल अ‍ॅपद्वारे ऑनलाइन वीजबिल भरण्यास ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. दरम्यान, या ग्राहकांनी अ‍ॅपद्वारे तब्बल 202 कोटी 7 लाख रुपयांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

ऑनलाइन पध्दतीने वीज बिल भरणार्‍या ग्राहकांना 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा ऑनलाइन पध्दतीकडे कल वाढला असून या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.वीज बिलाचा भरणा ऑनलाइन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात हा आकडा आणखी वाढले, असा विश्वास महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी व्यक्त केला.