महावितरण परिमंडळातर्फे शहिदांना अभिवादन

0

जळगाव। महावितरणच्या जळगाव परिमंडळातर्फे 23 मार्च रोजी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या वीर हुतात्म्यांचे स्मरणार्थ शहिद दिन साजरा करुन शहिदांच्या बलीदान साजरा करण्यात आला. ब्रिटीश साम्राज्याविरूध्द भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या महान क्रांतीकारी त्रिकुटाने अखेरपर्यंत लढा दिला. याप्रसंगी शहिद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.

शहिदांच्या प्रतिमेस केले पुष्पार्पण
युवकांसाठी हे क्रांतीकारक खुप मोठा आदर्श आहेत. शहिद दिनी या हुतात्म्यांना त्रिवार अभिवादन करतो, असे विचार औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी मांडले. याप्रसंगी अधिक्षक अभियंता संजय आकोडे, अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) अशोक साळुंके, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र म्हंकाळे, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रदीप पवार, कार्यकारी अभियंता (ग्राहक गार्‍हाणे निवारण मंच ) धनंजय मोहोड, कार्यकारी अभियंता (प्रशासन) नरेंद्र नारायणे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक कोळी, जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.