जळगाव । महावितरणच्या जळगांव परिमंडळातर्फे महात्मा बसवेश्वर यांची जयंतनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ जळगावचे केंद्र प्रमुख मिलींद पाटील, सागर साळी, सहाय्यक अभियंता पंकज कांबळे, योगेश सरोदे, सिध्दार्थ लोखंडे, आदी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्य लिपिक मधुसुदन सामुद्रे, दिपक कोळी यांनी परिश्रम घेतले.