बोदवड। मुक्तळ उपकेंद्र 33/11 केव्हीच्या महवितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा दोन अंतर्गत उभारण्यात आलेले विजेचे खांबाची उभारणीच्या मफिंग कामाचा निकृष्ट दर्जाचा असून पोल उभारणी, मफिंग काँक्रिट भरणे दर्जानुसार झालेले नाही. वीज वाहक पोल वारा, वादळामुळे केव्हाही कोसळू शकतो. यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खडीऐवजी दगडगोट्यांचा केला वापर
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा दोन योजनेंतर्गत मुक्तळ उपकेंद्राला जोडणारी 33 केव्ही वाहिन्या साळसिंगी, जलचक्र बु., वराड मुक्तळ व जलचक्र, वराड मुक्तळ 11 केव्ही वाहिनी, मुक्तळ वाकी बोरगाव 11 केव्ही वाहिनी, मुक्तळ पळासखेडा 11 केव्ही वाहिनी अशा चार मार्गावर वीज वाहिनीचे पोल उभारणीच्या मफिंग (खडे काँक्रिटने भरणे) च्या कामात सिमेंटचे प्रमाण कमी वापरले आहे. खडीऐवजी जंगलातील दगडगोटे व रेतीऐवजी क्रशर मशिनवरचा दगडाचा कच (डस्ट) चा वापर केला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे, वरवर मफिंग (काँक्रिट) दगडगोटे भरुन फक्त सहा इंच ते एक फुट काँक्रिट केले आहे. केलेल्या काँक्रिटला तडे गेले असून चारही वाहिनीच्या मार्गावरील वीज वाहक खांब वादळ, वारामुळे कधीही, केव्हाही कोसळू शकतात. याबाबत बोदवड वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंता मोरे यांच्याकडे गोपीचंद सुरवाडे यांनी जानेवारी महिन्यात तक्रार केली आहे. तक्रारीची दखल उपअभियंता मोरे यांनी घेतली नाही. तरी सर्व चारही वाहिन्या साळशिंगी जलचक्र बु., वराड मुक्तळ, मुक्तळ वराड जलचक्र बु., मुक्तळ वाकी बोरगाव, मुक्तळ पळासखेडा बु. शेलवड या मार्गांवरील मफिंग पोल उभारणीच्या कामाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे बोदवड तालुका शेतकरी शेतमजुर पंचायतचे अध्यक्ष गोपीचंद सुरवाडे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्य अभियंता, महावितरण जळगाव यांना दिली आहे.