महावितरण राबविणार ‘माझं कार्यालय, स्वच्छ कार्यालय’

0

जळगाव। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महावितरणच्या जळगांव परिमंडळाच्या वतीने जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ‘माझं कार्यालय, स्वच्छ कार्यालय’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.07 जुन ते 21 जुन 2017 हा उपक्रम कालावधी आहे. मंडळ, विभाग, उपविभाग, शाखा व उपकेंद्र स्तरावरील सर्व कार्यालये सहभागी असणार आहेत.

सर्व अधिकारी – कर्मचार्‍यांना स्वंयस्फुर्तपणे श्रमदानातून हा उपक्रम यशस्वी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. महाराष्ट्राला संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज या महापुरूषांचा वारसा लाभलेला आहे. समाजाला स्वच्छतेबाबत कृतीशील संदेश देण्याचे कार्य त्यांनी आजन्म केले. या परंपरेचा प्रत्येकाला अभिमान आहे.