महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागात अद्ययावत संगणीकरणासाठी कटिबद्ध

0

शिंदखेडा । ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी शिंदखेडा महाविद्यालयातच प्रत्येक विभागात अद्ययावत संगणकप्रणालीसह विवीध पदव्यूत्तर विषयाच्या शिक्षणाची सोय करण्यात येईल व त्यासाठी संस्था पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांनी दिली. गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात आयोजीत आला. त्यावेळी ते बोलत होते. यशस्वीतांना स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. ग्रामीण विद्यार्थी देखील अद्ययावत ज्ञानापासून वंचित राहू नये म्हणून महाविद्यालयाच्या आवारात वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यशस्वितेसाठी यांचे परिश्रम
यावेळी प्राचार्य बी.आर.चौधरी, प्रा.संभाजी पाटील, प्रा.तुषार करंके, प्रा.टि.आर. पाटील, प्रा.मनोज देसले, प्रा.महाजन, विद्यापिठ प्रतिनिधी चेतन माळी यांच्या सह यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी. आर. चौधरी यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रर्दशन प्रा. आर. के. पवार आणि प्रा. सावंत यांनी केले.

यांची होती उपस्थिती
संस्थेचे अध्यक्ष आ कुणाल पाटील, सहसंचालक उच्च शिक्षण डॉ.केशव तुपे, स्थानिक चेअरमन प्रफ्फूल सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, वामन पाटील, बळीराम पाटील, प्रा. सुरेश देसले, संजय सिसोदे, हरचंद साळुके, प्राचार्य बी.आर.चौधरी, प्रा.सी.व्ही.पाटील, प्रा.एस.व्ही. बोरसे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पारीतोषीक प्राप्त विभाग व विद्यार्थी संख्या-कला (12) विज्ञान(12) कॉमर्स(12) संगणक(6), वाचनालय(3), आविष्कार स्पर्धा(10), बेटी बचाओ स्पर्धा(3), विविध निबंध स्पर्धा(5) या शिवाय विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी.

शैक्षणिक माहिती विद्यार्थ्याना मिळणार
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये परीश्रम करण्याची ताकद अधिक असते. या ताकदिला विधायक कार्याची जोड देवून देशाच्या प्रगति मध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन सहसंचालक डॉ.केशव तुपे यांनी केले. आजचा तरूण वाचन व लेखन संस्कृतींपासून दूर जात आहे. तरूण सवयीचा गुलाम होवू पाहत आहे. नवे आव्हानं स्विकारतांना दिसत नाही. त्यामुळे युवकांनी विवीध विधायक विषयांवर लिखाण करून स्वतःचे अस्तित्व राखावे.आजचा तरूण समाजातील विघातक गोष्टींकडे ओढला जातो. त्यांनी अंर्तमनाला साद घालून काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवावे. यावेळी स्थानीक कमेटीचे अध्यक्ष प्रफ्फूल सिसोदे यांनी मनोगत व्यक्त केले.