महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक कार्यशाळा

0

जळगाव। लेवा एज्युकेशन युनियन संचलित नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांचे हक्क, विधीसंघर्षग्रस्त बालकांची काळजी व सरंक्षण अधिनियम, बेटी बचाओ-बेटी पढाओ विषयावर कायदेविषयक एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधीकारी के.एस.कुलकर्णी यांनी विद्यार्थींनींना बालकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी बालकांच्या हक्क पालनाची जबाबदारी प्रौढ नागरिकांवर असून त्याविषयी बालकांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन दिली. दुसर्‍या सत्रात विधीसंघर्षग्रस्त बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम या विषयावर सहदिवाणी न्यायाधिश पी.एस.पाटील यांनी विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायदे सांगितले.

शेवटच्या सत्रात ’बेटी बचाओ-बेटी पढाओ’, या विषयावर जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी लाभलेल्या मार्गदर्शकांना अरुण नारखेडे लिखीत ’न्यायामुर्ती रामानंद’ कादंबरी भेट दिली. प्रास्ताविक के.एच.ठोंबरे, सुत्रसंचालन प्रा.डॉ.दत्तराव राढोड यांनी केले. यावेळी उपप्राचार्या एस.एस.नेमाडे, अ‍ॅड.एल.व्ही.वाणी, अ‍ॅड.विजय दर्जी, पी.ए.पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डी.एम.बारी, प्रा.एल.ए.भारंबे, प्रा.व्ही.एम.जोगी, प्रा.आर.डी.वराडे, प्रा.जे.एस.कापुरे, प्रा.एल.एन.पाटील, प्रा.जे.आर.नेमाडे, प्रा.ए.ए.ओहळ, कृष्णा जंगले, के.एस.ठाकुर, सागर गाजरे आदींनी परिश्रम घेतले.