उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील ; नाहाटात साहित्य परीषद
भुसावळ :- विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच यशस्वी व संपन्न जीवन जगण्याची कला आत्मसात करावी, दिवसेंदिवस ती कला विकसित करीत जावे आणि अशा रितीने शिक्षण घेता घेता घेतलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात चांगल्या पध्दतीने अवलंब करीत जावे तसेच बौध्दिक विकासाबरोबर शारिरीक व मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील यांनी येथे व्यक्त केले. कला, विज्ञान व पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी भाषा व साहित्य परीषदेच्या दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.बी.एच.बर्हाटे उपस्थित होते.
इंग्रजी महोत्सवाच्या आजच्या दुसर्या दिवशी एकूण चार फेर्यांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. बी.ए. व एम.ए. इंग्रजीच्या जवळजवळ 25 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेची पहिली फेरी भाषा व साहित्यावर, दुसरी फेरी जनरल नॉलेज, तिसरी चित्र फेरी तर चौथी बझर फेरी असे स्पर्धेचे स्वरूप होते. परीक्षक म्हणून डॉ.झनके, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.डी.एन.पाटील यांनी काम पाहिले तर आयोजनासाठी प्रा.एन.एन.झोपे, प्रा.स्नेहल कापसे, इलाचे सर्व पदाधिकारी, इम्रान, मधुवंती, सना, जीवन, प्रतिमा, प्रतीक्षा, साजन यांनी अथक परीश्रम घेतले.