महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या युवतीला फुस लावून पळवले

A college-going girl from Warangaon area was seduced and abducted वरणगाव : वरणगाव शहरातील महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असलेल्या वेल्हाळा गावातील युवतीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिक्षणासाठी युवती आल्यानंतर पळवले
वरणगावच्या नूतन मराठा विद्यालयात वेल्हाळा येथील साडेसतरा वर्षीय युवती शिक्षणासाठी येत होती. मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी अडीच वाजेदरम्यान अज्ञाताने युवतीने पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून तरुणीच्या पित्याने वरणगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश बबन जाधव करीत आहेत.