महाविद्यालय प्रवेशाबाबत सहविचार सभा

0

जळगाव । येत्या आठवड्याभरात दहावीचा निकाल घोषीत होईल असा अंदाज आहे. त्याअनुषंगाने 11 वी व 12 वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थ सहाय्यित उच्च माध्यमिक विद्यालये तसेच आदिवासी विभागांतर्गत येणार्‍या उच्च माध्यमिक आश्रमशाळा यांच्या प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासोबत 2017-18 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया व शैक्षणिक कार्य प्रणालीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी 15 रोजी सकाळी 11 वाजता मू.जे.महाविद्यालय (स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय) येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर सभेत शिक्षण उपसंचालक नाशिक हे मार्गदर्शन करणार आहे. प्रवेश प्रक्रिया बाबत करावयाची कारवाही, प्रवेशाचे वेळापत्रक व सविस्तर सुचना यावेळी देण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केले आहे.