पिंपरी : भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी अहिंसेला मानवाचा उच्चतम नैतिक गुण मानला. त्यांनी जैन धर्माची अहिंसा, सत्य, अपरिग्रह, अस्तेय आणि ब्रह्मचर्य ही पंचशील तत्वे सांगितली. त्यांनी आपल्या जीवनात उपदेश आणि प्रवचनांच्या माध्यमातून जगाला मानव कल्याणाची योग्य दिशा दाखवली. त्यांनी दिलेला अंहिसेचा संदेश आचारण्यात आणण्याची आज खर्या अर्थाने गरज आहे. त्यामुळे सर्वांनी महावीरांच्या अहिंसेचा संदेश आचारणात आणावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. तसेच महावीर जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवून महावीरांना मानवंदना द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.