पिंपरी – डायमंड जैन सोशल ग्रुपच्यावतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त चिंचवड स्टेशन येथील जैन वर्धमान स्थानकामध्ये मोफत आरोग्य शिबिर, औषध वाटप, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती अध्यक्ष सुनील शहा यांनी दिली. आनंदनगर, साईबाबानगर, येथील 140 गरजू महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करुन त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात 24 जणांनी रक्तदान केले. याशिवाय 25 जणांनी अवयवदान व नेत्रदानाचे अर्ज भरले. जैन सोशल ग्रुपतर्फे चालविण्यात येणार्या एज्युकॉन या शैक्षणिक मदत उपक्रमासाठी दोन लाख चाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा झाली. गोग्रास या गायींसाठी चारा या उपक्रमासाठी सात हजार पाचशे रुपयांची देणगी गोळा झाली. डॉ. सुजाता फुलपगर यांच्या भक्तामर अनुष्ठानाचा सुमारे 200 जणांनी लाभ घेतला.