शहादा। महावीर नगरचे रहीवाशी चंद्रशेखर भीमराव पाटील महावीर नगर हे 1 ते 2 जून दरम्यान घराला कडी कोंडा लाऊन बाहेर गावी गेले होते.
अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधून घराच्या कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व एल. ईं. डी. टी. व्ही. होम थेटर आदी 51 हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. याबाबत शहादा पोलीसात चंद्रशेखर पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द घर फोडिच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. मनोज सरदार हे करीत आहे.