महिनाभरात फेकरीचा टोल नाका बंद होणार

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे ; रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा

भुसावळ- मेगा रीचार्ज प्रकल्पामुळे खान्देशातील शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार आहे मात्र प्रकल्प पूर्ण न झाल्यास बागायती जिवंत राहणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत दखल घ्यावी तसेच खान्देशात कृषी विद्यापीठ व्हावे, राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करावे, हार्टीकल्चर, टिशू कल्चरसह पशुवैद्यकीय दवाखान्याला मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत भाजपाच्या कार्यक्रमाला येणार्‍या कार्यकर्त्यांना फेकरी गेटवर टोल भरावा लागत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी महिनारात फेकरी टोल गेल बंद करणार असल्याची लेखी ग्वाही दिल्याची घोषणा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस.ग्राऊंड) वर गुरुवारी झालेल्या खासदार रक्षा खडसे यांच्या ‘समर्पण’ या कार्यवृत्तांताच्या प्रकाशनप्रसंगी दिली. माजी मंत्री खडसे यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करीत मतदारांनी असेच प्रेम ठेवावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रकल्पामुळे नागरीक विस्थापीत झाले असून त्यांना हक्काची घरे मिळणार असून मुख्यमंत्री त्याबाबत घोषणा करतील, असेही ते म्हणाले.