जळगाव। शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांत स्वच्छ भारत मिशन, पंतप्रधान आवास योजनेचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत शौचालय व घरकुल बांधकामाचे जिल्ह्याला मोठे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याचा उद्दिष्ट पुर्ततेकडे वाटचाल सुरु आहे मात्र इतर जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव जिल्हा आकडेवारी पाहता मागे आहे. येत्या महिन्याभरात कामे पुर्ण करण्याची तंबी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अधिकार्यांना दिली. सीईओंनी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विभागप्रमुख, विस्तार अधिकारी यांची बैठक घेऊन योजनांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्तमुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, ग्रामपंचायत मुख्यकार्यकारी अधिकारी बोटे, डीआडीए संचालक विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री दौरा
राज्याचे मुख्यमंत्र्याचा जिल्हा दौर्या अगोदरही दोन वेळा रद्द झाला आहे. येत्या 4 जूलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाळीसगाव तालुक्यातील विविध विकास कामाचे भूमिपुजन करण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रांचा दौरा लक्षात घेता सीईओंनी अधिकार्यांना दौर्या अगोदर कामकाज करण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री दौर्यानिमित्त जिल्हा परिषदेतील कामकाजांचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
40 ग्रा.पं.हागणदारीमुक्त
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्याला मोठे उद्दिष्ट देण्यात आले होते. शासन हागणदारीमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील 40 टक्के ग्रामपंचायत मार्च अखेर हागणदारीमुक्त झाली आहेत. उर्वरीत ग्रामपंचायतींची तपासणी सुरु असून अहवाल अद्याप बाकी आहे. राज्यातील चार समिती विविध संस्था हागणदारीमुक्तीची पाहणी करीत आहे. जिल्ह्यातील 1151 ग्रामपंचायतींपैकी चारशेच्यावर ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाले आहे. 126 ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात आली आहे.
मुदतीत कामे करा
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. जिल्ह्याला मोठे उद्दिष्ट होते. ज्या गावातील शौचालये बांधकामाची संख्या शंभर पेक्षा कमी असेल अशा गावातील शौचालये 15 जूलै पर्यत बांधुन पुर्ण करावेत असे आदेश सीईओंनी दिले. तसेच घरकुल योजनेची कामे 30 जुन पर्यत पुर्ण करण्याची सुचनाही यावेळी त्यांनी दिली. मुदतीत जर काम करण्याचे आदेश त्यांनी दिले.
चौकशी करणार
विविध उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना काम मुदतीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जर कामकाज मुदतीत पुर्ण केले नाही तर चौकशी केली जाईल अशी कडक तंबी सीईओंनी उपस्थित अधिकार्यांना दिली. शासकीय योजना अंमलबजावणी अभावी रखडल्या असून योग्य अंमलबजावणी करुन जनतेपर्यत योजना पोहचविण्याचे आदेश त्यांनी दिले.