महिलांचा ‘रंग माझा साडीत वेगळा’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

0
चिंचवड नवरात्र महोत्सवामध्ये घेतली आगळी वेगळी स्पर्धा
विविध प्रकार परिधान करून महिलांनी केले रॅम्प वॉक
चिंचवड : भारतात विविध प्रांतनिहाय साडी परिधान करण्याचे अनेक वैविध्यपूर्ण प्रकार आहेत. कालानुरूप पारंपारिक साड्या परिधान करण्याच्या नवनवीन आधुनिक पद्धती येत आहेत. महिला पेहराव कितीही बदलत असला तरी साडीचे स्थान अढळ आहे. स्त्री आणि साडी यांचे अतूट नाते उलगडून दाखवणारा एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे रंग माझा साडीत वेगळा. या कार्यक्रमास तरुणी, महिला, ज्येष्ठ महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये प्रत्येकी एका ग्रुपमध्ये 10 असे 27 ग्रुप सहभागी झाले होते. प्रत्येक ग्रुपमधील महिलांनी वेगवेगळ्या साडीचे प्रकार परिधान करून रॅम्प वॉक केला. साडीच्या परीधानाचे प्रकार व महत्त्व याबद्दल परीक्षकांनी प्रश्‍न विचारले.
विविध ग्रुपचा सहभाग
रंग माझा साडीत वेगळा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांच्या ग्रुपपैकी फिटनेस ग्रुप महाराष्ट्राची विविधता, मराठी अस्मिता, आनंदवन ग्रुप, नांदा सौख्य भरे ग्रुप, स्वामिनी ग्रुप, इंडो-वेस्टर्न ग्रुप, सागरिका ग्रुप, सौजन्या ग्रुप, लिटल स्टार ग्रुप, कोहिनूर ग्रुप या ग्रुपनी विविध थीम्स घेऊन उल्लेखनीय असे सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी क्षमा धुमाळ, राजश्री गागरे, रोहिणी जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी नगरसेविका स्विनल म्हेत्रे, निर्मला कुटे, आरती चौंधे उपस्थित होत्या. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्मिता जोशी, साधना मांडे, निशा चिंचवडे, पल्लवी रिठे, पूर्वा बारसावडे, अनिता कोळसुने, भाग्यश्री देशपांडे, दर्शना संगमे, ओजस्विनी चव्हाण, उज्वला कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.