जळगाव । ओ. पी. एम. महिला उद्योगाच्या नावाने रोजगाराचे अमिष दाखवून 2 हजार 261 महिलांकडून प्रत्येकी हजार रुपये घेवून सुमारे 22 लाख 61 हजार रुपयांची फसवणुक केल्याची घटना 25 रोजी उघडकीस आली होती. दरम्यान या प्रकरणी संशयीत मनोज नाथबाबा याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मनोज आधार नाथबाबा (खंडेराव नगर) या तरुणाने ओ. पी. एम. या नावाने मसाल्याचा उद्योगाकरीता जिल्ह्यातील 23 महिलांची सीआपी म्हणून नेमणुक केली होती.
सीआरपीचे 100 सभासदांची केली फसवणूक
या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देतो असे सांगून त्यांच्या कडून प्रत्येकी हजार रुपये वसूल केले. तसेच ज्या सीआरपी महिलेचे 100 सभासद झाले. त्या सीआरपी महिलेला महिन्याला 5 हजार पगार देण्याचे आश्वासन मनोज नाथबाबा याने दिले होते. परंतू 4 रोजी नाथबाबा याने सीआपींना कच्चा माल व पगार देणे अचानक बंद केले. यावेळी सीआरपी महिलांनी मनोज नाथबाबाकडे महिला सभासदांचे पैसे करण्याची मागणी केली. परंतू मनोज नाथबाबाकडून पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. दरम्यान आज 2 हजार 261 महिलांकडून 22 लाख 61 हजार रुपये घेवून त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी सुनिता सुनिल महाजन यांच्या फिर्यादीवरुन मनोज नाथबाबा याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवूणक करणार्या मनोज नाथबाबा याला अटक व्हावी यासाठी दुपारी 12 वाजता सुमारे 50 ते 60 महिला एमआयडीसी पोलिसात आल्या होत्या. परंतू पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने महिलांनी सुमारे तीन तास पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला होता.