वाघिरे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी शिबीर
सासवड : ‘समाजाची प्रतिष्ठा ही महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असते. ज्या समाजात मुली आणि महिला सुरक्षित नाहीत तो समाज प्रगती करू शकत नाही. मुलींची सुरक्षा हा केवळ तिचा अथवा तिच्या कुटुंबाचा प्रश्न नसून ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. समाजाने तिला सुरक्षेचे कवच द्यायला पाहिजे’, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निर्भय कन्या अभियान तसेच पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्ट व ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशनच्या माध्यमातून सासवड येथील वाघीरे महाविद्यालयातील विद्यार्थीनींसाठी स्व-संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन खासदार सुळे यांनी केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महिलांनी आपले संरक्षण स्वत:च करायला शिकले पाहिजे. त्यासाठीची विविध कला आत्मसात करायला हवी. महिलांच्या मनात आत्मविश्वास व जिद्द असेल आणि प्रतिकार करण्याची शक्ती असले
तर अत्याचाराचे प्रमाण कमी होईल.
दोन दिवसीय शिबिर
थांग-ता ही भारतातील प्राचीन मार्शल आर्ट युद्ध कला आहे. महाराष्ट्र थांग-ता संघटना ही राष्ट्रीय स्तरावरील थांग-ता संघटनेशी संलग्न आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत या संघटनेच्या माधमातून प्रशिक्षण दिले जाते. या संघटनेचे मुख्य प्रशिक्षक महावीर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस प्रशिक्षणाचे धडे दिले जात आहे.