भुसावळ– शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून नागरीकांना वेठीस धरले जात असल्याने संतप्त महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला. प्रसंगी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. शहरातील तुकाराम नगरासह सीमा पार्क व अन्य भागात पाणीप्रश्न गंभीर बनल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त करीत सत्ताधार्यांविषयी रोष व्यक्त केला. या भागातील रस्ते, गटारीसह अन्य समस्या सुटत नसल्याने तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांच्यासह नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.