महिलांना गॅस शेगडीचे वाटप

0

पिंपरी : रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन वाहतूक आघाडीचे राज्य प्रदेश अध्यक्ष अजीजभाई शेख यांच्या सहकार्याने नेहरूनगर परिसरातील 200 गरजू महिलांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गंत मोफत गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले.

खोटी माहिती कोणी देत असेल किंवा गॅस जोडणी देण्यासाठी पैशांची मागणी करत असल्यास पोलिसांमध्ये तक्रार द्यावी, असे आवाहन शहर अध्यक्ष सुधाकर वारभुवन यांनी यावेळी केले. तसेच उज्ज्वला गॅस योजनेविषयी माहिती हवी असल्यास पिंपरी, आंबेडकर चौकातील रिपब्लिकन वाहतूक आघाडीच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही सांगितले.मीरा मोहन विधाते, अश्‍विनी पवार, राधा जाधव, अश्‍विनी रांजने, सामाजिक कार्यकर्ते मुमताज शेख, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.