महिलांना शिलाई मशीनचे वाटप

0

जळगाव । केंद्रातील सरकारला 26 मे रोजी 3 पूर्ण झाल्या बद्दल भा.ज.पा.जिल्हा महानगर तर्फे आज दि. 26 मे रोजी शुक्रवार रोजी वसंत स्मृती बळीराम पेठ येथे भाजप महानगराध्यक्ष तथा आ.सुरेश दामू भोळे यांच्या हस्ते जळगाव शहरातील नऊ मंडलातून 18 गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. जळगाव शहरातील नऊ मंडलातून 18 गरजू महिलां भगिनीना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी महिलांना शिलाई मशिन वाटपातूून रोजगार उपलब्ध होणार आहे. महिन्यातून पाच मशिन भाजप महानगरकडून वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पदाधिकार्‍यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, शिवदास साळुंखे, महेश जोशी, मनपा गटनेते सुनील माळी,सुभाष शौचे, उज्वला बेंडाळे, बापू ठाकरे, राजू घुगे, सरिता नेरकर, वंदना पाटील, नितीन गायकवाड, प्रदेश युवा सरचिणीस गितांजली ठाकरे, नगरसेविका ज्योतीताई चव्हाण, मंडल अध्यक्ष राजू मराठे, कपिल पाटील, प्रा.जीवन अत्तरदे, विनोद मराठे, राहुल वाघ, धीरज सोनावणे, प्रदीप रोटे, विविध आघाडी अध्यक्ष केशव नारखेडे, महेंद्र पाटील, प्रा.भगतसिंह पाटील, विजय शिंदे, किशोर वाघ, हेमंत शर्मा, आनंद सपकाळे, ज्योतीताई राजपूत, विजय पिंगळे, चंदू महाले, मनोहर तेजवानी, संजय लुल्ला, कृष्णा नेमाडे, राहुल लष्करे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस दीपक सूर्यवंशी यांनी केले.