जळगाव। ग्राहकाला वस्तू घेताना योग्य ते मार्गदर्शन केल्यास विकत असलेल्या वस्तू बाबत फायदे तोटे समजावून सांगितल्यास ग्राहकांना वस्तू घेण्याकडे कल असतो. 21 वे शतकात धकाधकीच्रा जीवनात लोकांकडे वेळ नाही, यामुळे कमीत कमी वेळेमध्ये आपल्रा वस्तूची उत्तमरीत्या माहिती लोकांपर्यत पोहचवून ती वस्तू विक्री करणे हे फार मोठे कसब असून; ते महिलांनी आत्मसात केले पाहिजे. कामगार कल्याण केंद्र, ललित कला भवन आयोजित महिलांसाठी उद्योग विषयी मार्गदर्शन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रांच्या प्रशिक्षक पल्लवी भोगे यांनी केले.
’नफा’ बाबत महिलांनी विचार करावा
यावेळी कामगार कल्याण निरीक्षक अजर व्ही.निकम,प्रशिक्षक ज्योती महाजन, केंद्र संचालक संदीप महाजन गायत्री कुळकर्णी आदी उपस्थित होते. व्यावसाय करीत असताना नम्रता,शिष्टाचार,राहणीमान, भाषा,सादरीकरण या गुणांचा वस्तूचा दर्जा,बाजारपेठेतील स्पर्धा, किमंत, पॅकेजींग, जागा, भांडवल व जाहीरात यांचा विचार करून नफा कसा मिळवता येईल याबाबत विचार करायला पाहिजे. आपल्रा वस्तूची जाहीरात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रमाणात कशी होऊ शकेल. तसेच कल्सटर्डच्रा योजनेचा लाभ घेण्यासह आदी विषयाचे मार्गदर्शन केले.
मेहनतीने यश शक्य
एकाग्रता , चिकाटी, परीश्रमाच्या बळावरच आपण एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. हस्तपत्र, व्हीजिटींग कार्ड,बॅनर, पोस्टर्स,दिशादर्शक याचा वापर करून आपल्रा वस्तूची चांगली जाहिरात करता येते; लग्न, मूंजी,बारसे आध्रात्मिक व सार्वजनिक ठिकाणी आपला व्यवसायाची जाहिरात करून, यशस्वी उद्योजक बनायचे असल्याचे मार्गदर्शन करून यावेळी करण्यात आले. प्रशिक्षणार्थीं महिलांनी प्रश्न मांडले असता यावेळी त्याचे समस्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केंद्रसंचालक संदीप चव्हाण यांनी केले, तर आभार कलानिरीक्षक अजय निकम यांनी मानलेत.