तळेगाव दाभाडे : महिलांनी सर्वच क्षेत्रात धाडसाने पुढे येऊन आपल्या स्पर्धात्मक कामाचा ठसा निर्माण करावा. असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला मंचच्या संस्थापिका सारिका संजय भेगडे यांनी केले.तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने महिला बाल कल्याण समिती कडून जागतिक महिला दिनाच्या निमित्त विविध कार्यकर्माचे अयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ सारिका संजय भेगडे या होत्या. या वेळीं शहरातील 20 महिलांना विविध क्षेत्रात समाजपयोगी कार्य केल्याबद्दल ‘आदर्श गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी खेळ पैठणीचा ,दुचाकी रॅली,शूर महिलांच्या जीवनावर एकांकिका,आदर्श महिला पुरस्कार आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बचतगटांना फिरत्या निधीचे वाटप
यावेळी दीनदयाळ अत्योदय योजना राष्ट्रीय नागरी अभियाना अंतर्गत बालाजी महिला गट,श्री स्वामी समर्थ महिला बचत गट,महालक्ष्मी महिला बचत गट यांना प्रत्येकी रुपये 10 हजार फिरता निधीचे वाटप करण्यात आले.प्रस्ताविक महिला बाल कल्याण समिती सभापती संध्याताई भेगडे यांनी केले. तर सारिका भेगडे, चित्राताई जगनाडे, हेमेलता खळदे, वैशाली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक ,पदाधिकारी,व महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
यावेळी घेण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजश्री पाटील,व्दितीय प्रियदर्शनी हेंद्रे,तर तृतीय क्रमांक जया लाटकर यांनी पटकाविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन उपसभापती प्राची हेंद्रे-दळवी,समन्वयक सारिका लामखेडे यांनी केले, तर आभार नगरसेविका काजल गटे यांनी केले.