महिलांनो परत जावे, अन्यथा मंदिराची दारं बंद करू – मुख्य पुजाऱ्यांचा इशारा

0

केरळ : सबरीमाला देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या १०-५० वयोगटातील महिलांनी आताच परत जावे अन्यथा आम्ही मंदिराची दारं बंद करू असा इशारा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान मंदिराच्या प्रवेशापर्यंत पोहोचलेल्या दोन महिलांनाही मंदिर समितीने परत पाठवले आहे.

सबरीमालाच्या अय्यपा स्वामींच्या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी नव्हती. अय्यपा स्वामी ब्रह्मचारी असल्याच्या मान्यतेमुळे या महिलांना परवानगी नाकारण्यात येत होती. पण काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कोणीच मंदिरात जाण्यापासून रोखू शकत नाही असा निकाल दिला. त्यानंतर यात्रा सुरू झाल्यानंतरच अनेक महिलांनी मंदिरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पण मंदिर समितीच्या वतीन कोणालाच पुढे येऊ दिलेले नाही. आतापर्यंत तीन पत्रकार महिलांनी मंदिरात जाण्याचा धाडसी पण अयशस्वी प्रयत्न केला. याबाबत पुजाऱ्याला विचारले असता ते म्हणाले,’ सबरीमालाचे मंदिर हे काही स्त्रीस्वातंत्र्याचे मुद्दे सिद्ध करण्याची जागा नव्हे. मंदिरात येण्यापूर्वी ४१ दिवस कडक उपास आणि अनेक पथ्य पाळावी लागतात. महिला त्या पाळू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी आताच परत जावं अन्यथा आम्ही मंदिरांची दारं बंद करू’ असे म्हंटले आहे.