महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबीराचे आयोजन

0

जळगाव । निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच बदलत्या ’ऋतूमध्ये आहार आणि विहार’ याविषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर आणि व्याख्यान शनिवार 28 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत आयोजित केले आहे. याकार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून के.सी.ई. सोसायटी (मु.जे.महाविद्यालय) संचालित मदर टेरेसा हेल्थ केअर सेंटरच्या मेडिकल ऑफिसर डॉ. लीना चौधरी तर प्रमुख पाहुण्या म्हणून मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या संचालिका सौ.अनुया कक्कड उपस्थित राहणार आहे. एका महिलेचे आरोग्य चांगले तर संपूर्ण परिवाराचे आरोग्य चांगले या धर्तीवर महिलांमध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हिमोग्लोबिन तपासणी शिबीर आणि बदलत्या ऋतूत आहार – विहार मार्गदर्शन व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी असलेली ही पर्वणी पूर्णतः मोफत असल्यामुळे जास्ती जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन निर्धार योग प्रबोधिनीच्या स्मिता पिले यांनी केले आहे.