महिलांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील महिलांसाठी चाकण(ता.खेड)येथे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,पुणे आणि मानव विकास कल्याण ट्रस्ट,चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.11) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ.सुरेश गोरे यांनी दिली.

श्री शिवाजी विद्यामंदिर,चाकण येथे फक्त महिलांकरिता आयोजित या रोजगार मेळाव्यामद्धे चाकण,भोसरी, पिंपरी-चिंचवड व रांजणगाव औद्योगिक परिसरातील एकूण 28 कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्याकडून एकूण 2742 रिक्त पदांसाठी कामगार भरती करण्यात येणार आहे.खेड तालुक्यातील महिलांनी रविवारी रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहून या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आमदार सुरेश गोरे यांनी केले आहे.