महिलाराज आणा भ्रष्ट्राचाराला लगाम बसवा!

0

नवी दिल्ली-ज्या सरकारमध्ये महिलांचा मोठ्याप्रमाणात समावेश असतो तिथे भ्रष्टाचार कमी असतो, असे एका संशोधन अहवालात आढळून आले आहे. जगातील १२५ देशांपेक्षा अधिक देशातील आकडेवारीचे विश्लेषण करून तयार करण्यात आलेल्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. युरोपमधील ज्या ठिकाणी स्थानिक राजकारणात महिलांचा अधिक समावेश आहे तिथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. ‘जर्नल ऑफ इकॉनॉमिक बिहेवियर अँड ऑर्गनायजेशन’ मध्ये प्रकाशित या अहवालात स्थानिक राजकारणातही महिलांच्या भागिदारीचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे.

सुदिप्ता सारंगी अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापक असून त्यांच्या या अभ्यासात महिला सशक्तीकरण, नेतृत्वाच्या भूमिकेत त्यांची उपस्थिती तसेच सरकारमध्ये त्यांच्या प्रतिनिधित्वाचे महत्व दिसून येते. हा अभ्यास प्रसिद्ध संशोधकांनी केलेला आहे. यातीलच एक चंदन झा असून ते अमेरिकेतील एका महाविद्यालयात कार्यरत आहेत. महिलांचे धोरण हे पुरूषांपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्यामुळे त्या भ्रष्टाचार रोखण्यात यशस्वी होतात, असे सर्वच संशोधकांचे म्हणणे आले आहे. महिला अशा नितीची निवड करतात जे साधारणपणे कुटुंब कल्याण, मुलं आणि महिलांशी संबंधीत असतात. तर व्यवसायातही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी महिलांची संख्या जास्त असते अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही सांगितले आहे.