महिला अधिकार्‍यास लाच स्विकारताना अटक

0

जळगाव । जागतिक महिला दिनाच्या धामधुम असताना येथील पंचायत समिती कार्यालयातील जबाबदार महिला अधिकार्याने एका गरजू महिलेकडे लाचेची मागणी करुन ती स्विकारताना अटक करण्यात आली. या प्रकारामुळे महिला दिनाला काळीमा फासली गेली आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल अनुदानाचा तिसरा हप्ता घेण्यासाठी लाभार्ती महिला पंचायत समिती कार्यालयात गेल्या असता पंचायत समितीच्या गृह निर्माण अभियंता भाग्यश्री शिंदे यांनी यांनी या महिलेकडूने अनुदानाचा तिसरा हप्ता देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सापळा रचून अटक केली.

इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झाले होते. इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल अनुदानाची रक्कम हि तीन टप्प्यांमध्ये शासनाकडून देण्यात येते. त्यानुसार मंजूर अनुदानाचा तिसरा हप्ता घेण्यासाठी तक्रारदार या पंचायत समिती कार्यालयात गेल्या असता अभियंता भाग्यश्री शिंदे यांनी यांनी तक्रारदार महिलेकडे अनुदानाचा तिसरार हप्ता देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केल्याबाबत त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची लाच मागणी पडताळणी केली असता शिंदे यांनी तडजोडीअंती 1 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.