महिला उद्योजकांची दिवाळी गोड ; मेळाव्याच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तरळले आनंदाश्रू

0

भुसावळात महिला उद्योजक मेळाव्याचा समारोप ; खरेदीसाठी उडाली झुंबड

भुसावळ- सर्वसाधारण परीस्थितीशी दोन हात करीत कुटुंबाचा पप्रंच चालवणार्‍या महिलांसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाने शहरात आयोजित केलेल्या तीन दिवसीय उद्योजक मेळाव्याला शहरवासीयांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ऐन दिवाळीत दोन पैसे मिळाल्याने महिला उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला तर मंडळाने राबवलेल्या उपक्रमामुळे घरखर्च चालवण्यास मदत झाल्याने नकळत उद्योजक महिलांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू तरळले. मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे व मंडळाला या महिलांनी शतशः धन्यवाद देत पुढील वर्षीही याच पद्धत्तीने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

तीन दिवसीय उद्योजक मेळाव्याचा समारोप
शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ब्राह्मण संघात 31 ते 2 नोव्हेंबर दरम्यान महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. समारोपाच्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. आमदार संजय सावकारे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या पत्नी शीतल थोरात, गट शिक्षणाधिकारी सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, पवार, भारत विकास परीषदेच्या भुसावळ शाखेच्या अध्यक्षा डॉ.नीलिमा नेहते, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळच्या प्रेसिडेंट नूतन फालक व सदस्य, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या प्रेसिडेंट सुनीता पाचपांडे, सचिव मृणाल पाटील, मोना भंगाळे आदींनी भेट देवून पाहणी केली. सुमारे 90 महिला उद्योजकांनी या मेळाव्यात स्टॉल लावले तर महिलांसह शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालही झाली.

यांनी घेतले मेळाव्यासाठी परीश्रम
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या सचिव लता सोनवणे, उपाध्यक्षा सुनंदा भारुळे, सदस्य अनिता आंबेकर, अलका भटकर, सरला सावकारे, मनिषा काकडे, अर्चना सोनवणे, सारीरका यादव, श्रध्दा चौधरी, रवींद्र पाटील, दिनेश चांदणे व दीपक बाविस्कर आदींनी परीश्रम घेतले.