महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्याला सुरुवात

0

नवी दिल्ली- महिला क्रिकेट संघाचा एशिया कपच्या अंतिम सामना आज भारत विरुद्ध बांगलादेश असा रंगणार आहे. अंतिम सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे. मलेशिया येथील कुआलालम्पुर येथे हा सामना होत आहे.

उपांत्यपूर्व सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारत अंतिम सामन्यात मजल मारली आहे. तर दुसरीकडे बांगलादेश संघाने मलेशियावर विजय मिळवीत अंतिम सामन्यात स्थान मिळविले होते.

सामना सुरु झाला असून भारतीय संघाने ३ षटकात १२ धावांवर एक गडी गमावला आहे. प्रथम फलंदाजी करतांना भारतातर्फे मिताली राज व मंधना सलामीला आले होते. मात्र ७ धावा करून मंधना धावचीत झाली.