महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना राजीव शुक्ला चुकले

0

नवी दिल्ली । आयसीसी महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारतीय महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. त्यामुळे कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. पण चुकीच्या ट्विटमुळे राजीव शुक्लांवर टीकेचे धनी झालेत.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यामध्ये दिमाखात प्रवेश केला. संपूर्ण देशभरात भारतीय संघाच्या कामगिरीचें कौतुक होतआहे. दरम्यान, महिला क्रिकेट संघाने नेमके कोणत्या स्पर्धेत यश मिळवलंय हेच राजीव शुक्ला विसरले. राजीव शुक्ला यांनी विश्‍वचषक स्पर्धेऐवजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केल्याबद्दल भारतीय शुभेच्छा दिल्या. शुक्ला यांच्या या ट्विटनंतर नेटिझन्सनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली. त्यानंतर त्यांनी हे ट्विट रद्द केले.

एरवी संयत आणि डिप्लोमॅटीक संवाद साधणार्‍या राजीव शुक्ला यांना अभिनंदनाचे हे ट्वीट चांगलेच लक्षात राहिल. यापुढे ट्वीट करताना शब्दप्रयोग नीट करतील, अशी आशा नेटीझन्सनी व्यक्त केली.