महिला ग्रामसेविकेला अरेरावी, चितोड्याच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

चितोडा, ता.यावल:- महिला ग्रामसेविकेने नाहरकत दाखला तत्काळ द्यावा असा आग्रह करीत शासकिय कामात अडथळा निर्माण करून धमकी देणार्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 31 मार्च रोजी चितोडा, ता.यावल ग्रामपंचायतीत घडली तर सोमवारी या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामसेविका रूपाली अशोक तळेले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजेला गावातील रहिवासी प्रवीण वासुदेव भंगाळे यांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात टन काटा (भुईकाटा) टाकण्या करीता ग्रामपंचायतीचा नाहरक दाखल हवा, असे सांगितल्यानंतर नाहरकत दाखला देणे कामी अर्जा सोबत जागेची बिनशेती परवानगी सह विविध कागदोपत्र आवश्यक असून अर्ज व आवश्यक कागदपत्रे ही ग्रामसभेसमोर ठेवून मगचं नाहरत देता येईल, असे ग्रामसेविकेने सांगितल्याने प्रवीण भंगाळे यांनी अरेरावीच्या भाषेचा वापर करीत धमकी देत शासकीय कामात अडथळा. तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.