मुरुड : विविध कारणांमुळे विभक्त झालेल्या पती पत्नी यांचे मनोमिलन करणे हे मोठे अवघड काम आहे. दोन जीवांची तुटलेली मने पुन्हा जोडून त्यांचा संसार पूर्वीप्रमाणे चालविण्याचे काम हे रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महिला तक्रार निवारण केंद्रात सुरू आहे. महिला तक्रार निवारण केंद्रातकार्यरत असलेल्या महिला अधीकारी कर्मचारी यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे सन 2011 पासून मे 2017 पर्यन्त विभक्त झालेल्या 1284 पैकी 1126 जोडप्यांचा संसार हा पुन्हा मार्गी लागला आहे. दाखल झालेल्या तक्रारी सामंजस्याने कशा प्रकारे सोडविता येतील, त्या सोडवित असताना परत संसाराची घडी ही विस्कटू नये याची काळजीघेत महिला तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी यांचा भर असतो.
यामध्ये सन 2011मध्ये 145, सन 2012 मध्ये 259, सन 2013मध्ये 304, सन 2014मध्ये184, सन2015 मध्ये187, सन2016मध्ये156, सन 2017 मे अखेर 60 अशी 1295जोडप्यांची भांडणाची प्रकरणे दाखल झाली होती.यापैकी 1126 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला आहे. यामध्ये सन 2011 मध्ये 134,सन 2012 मध्ये228, सन 2013मध्ये 257,सन2014 मध्ये 168,सन 2015मध्ये 172,सन 2016 मध्ये144, सन मी 2017अखेर 32 मध्ये 23 अशी 1135 प्रकरणाचा समावेश आहे.
तक्रार निवारण केंद्राची पायरी चढलेल्या जोडप्यांचा संसार सुरळीत
सात वर्षांच्या काळात यशस्वीरीत्या पतिपत्नी यांच्या मध्ये तडजोड केल्याने तक्रार निवारण केंद्राची पायरी चढलेल्या जोडप्यांचा संसार सुरळीत सुरू आहे. या केंद्रात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील,महिला पोलीस नाईक सायली म्हात्रे, महिला पोलीस शिपाई आरती भगत, संजीवनी म्हात्रे आदी या तक्रारी घेऊन येणार्या महिलांचे तसेच तिच्या गैरअर्जदार पती ,सासरच्या मंडळींची समजूत काढतात. योग्य मार्गदर्शन करीत त्यांचे मतपरिवर्तन केले जाते. परंतु आता सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांची या विभागातून बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक नामदेव बंडनेर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अखेर 77 प्रकरणे पोलिसांकडे वर्ग
महिला तक्रार निवारण कक्षातील कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्नानंतर देखील दोन्ही पक्ष काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर 77 प्रकरणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. पोलिसांनी कलम 498 अ नुसार गुन्ह्याच्या नोंदी केल्या आहेत.
समुपदेशनसाठी 57 अर्ज पर जिल्ह्यात
रायगड जिल्हा पोलीस यांच्या यशस्वीपणे मध्यस्थी केली असल्याने हजारो संसार हे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. परंतु गेल्या सात वर्षांत 65अर्ज हे रायगड पोलिसांनी हे पर जिल्ह्यात पाठविले आहे. यामध्ये सन 2011मध्ये 5, सन 2012 मध्ये 12, सन 2013 मध्ये 24, सन 2014 मध्ये3, सन2015 मध्ये6,सन2016मध्ये7,सन मी 2017 अखेर 8 जोडप्यांच्या अर्जाचा समावेश आहे.