तळेगाव । जागतिक महिला दिनानिमित्त अंबर आणि जागतिक मानवअधिकार जनजागर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवानी तुकाराम होनुरे, अबोली सदाशिव जाधव यांचा विषेश सत्कार करण्यात आला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुलोचना आवारे, सारीका संजय भेगडे, संपदा थिटे, शिला डावरे, कुसुम गुलाबराव टकले आदी महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. सुरेश साकोळकर, अतुल पवार, प्रदीप नाईक, गणेश भेगडे, नितीन फाकटकर, विजय पलंगे, रोहित लागे, शोभा भेगडे, रुपाली दाभाडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.