चेन्नई : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच वादात सापडले आहेत. सेक्स फॉर डिग्री प्रकरणात नाव आल्याने पुरोहित यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. मात्र पत्रकार परिषद संपताना त्यांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीशिवाय स्पर्श केला.
त्यामुळे पुरोहित पुन्हा नव्या वादात अडकले आहेत. सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र याठिकाणी राज्यपालांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. यानंतर महिला पत्रकाराने ट्विट करत याबद्दल संताप व्यक्त केला. पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला, असे महिला पत्रकाराने ट्विटमध्ये म्हटले आहे.