नगरसेविका सुलक्षणा धर यांची मागणी
पिंपरी : महिला पोलिसांचे कामाचे तास निश्चित नसतात. त्यांना बर्याचदा 24 तास कामावर थांबावे लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील महिला पोलिसांसाठी पोलिस ठाण्यात, चौकीमध्ये, सार्वजनिक शौचालयात सॅनेटरी नॅपकीन्सचे व्हेडींग मशिन्स व डिस्पोजल मशिन्स बसविण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सुलक्षणा धर यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महिला पोलिसांची गैरसोय
धर यांनी दिलेल्या निवेदनांत म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने शहरातील महाविद्यालये, शाळांमध्ये मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीनचे व्हेडींग मशिन्स व डिस्पोजल मशिन्स बसविण्याची कार्यवाही चालू आहे. विद्यार्थिनींसोबत पोलिस ठाणे व पोलिस चौक्यांमध्येही महिला पोलिसांसाठी सॅनेटरी नॅपकीनचे व्हेडींग मशिन्स व डिस्पोजल मशिन्स बसविण्याची आवश्यकता आहे. महिला पोलिसांना ड्यूटीवर असताना मोठी अडचण होत असते. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांमध्ये ही सेवा ठेवली तर या महिलांची मोठी गैरसोय दूर होईल. शहरातील सर्व पोलीस ठाणे व चौक्यांमध्ये महिला शौचालय व सॅनेटरी नॅपकीनचे व्हे़डींग मशिन्स व डिस्पोजल मशिन्स बसविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.