महिला पोलीस व पतीमध्ये फ्रि-स्टाईल

0

जळगाव प्रतिनिधी । न्यायालयाच्या आवारात महिला पोलीस व तीच्या पतीत हाणामारी झाल्याने याबाबत एकच चर्चा रंगली.

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात सेवेत असलेल्या महिला पोलीस व तिच्या पती या दोघांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला असून त्यांनी घटस्फोटासाठी जळगाव न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. सोमवारी तारीख असल्याने ते न्यायालयात आले होते; मात्र, वादाला सुरुवात झाली. त्यात पतीने पत्नी व तिच्या काकांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीला प्रत्युत्तर म्हणून पोलीस असलेल्या पत्नीने पतीलाही झोडपले. यामुळे न्यायालयाच्या परिसरात एकच चर्चा रंगली.