भुसावळ : महिला प्रवासी झोपल्याची संधी साधून चोरट्यांनी मोबाईल लांबवल्याची घटना अप सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये रविवारी घडली. यवतमाळ येथील सुरेखा इंगोले या अप सेवाग्राम एक्स्प्रेसने धामणगाव ते मुंबई असा प्रवास करीत असताना रविवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास इंगाले यांच्या झोपेचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांचा सात हजार 690 रूपये किंमतीचा मोबाईल लांबवला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार मधुकर न्हावकर करीत आहेत.