महिला बचतगटांसाठी हक्कांचे बाजारपेठ उपलब्ध

0
पवनाथडी यात्रा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावरच होणार
पिंपरी चिंचवड : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दरवर्षी पवनाथडी जत्रा भरविण्यात येते. ही जत्रा कोठे भरवायची यावरुन सतत नगरसेवकात मतभेद निर्माण होतात. मात्र, स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 मध्ये जत्रा भरविण्याचा ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्बल दहा वर्षांपूर्वीपासून पवनाथडी जत्रा भरविण्यात येत आहे. शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी पवनाथडी जत्रेचे हे 12 वर्षांचे आहे. गतवर्षी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पवनाथडी जत्रेवर खर्च अधिक होवू लागल्याने त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जत्रेचा खर्च 80 लाखावरुन 45 लाखांवर आणून ही जत्रा भरविण्यात आली होती. यंदा यात्रेवर किती खर्च करणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभेत पवनाथडी जत्रा भरविण्यावरुन नगरसेवकात मतभेद झाले होते. त्यावरुन दोन ठराव होवून भोसरीगाव जत्रा मैदान की सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या अथवा दुसर्‍या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला. त्यामुळे त्या ठरावारुन पवनाथडी जत्रेच्या ठिकाणावरुन संभ्रामवस्था निर्माण झाली. स्थायी समितीने केलेल्या ठरावामुळे पवनाथडी जत्रेच्या वादावर आता पडदा पडणार आहे.