महिला लोकशाही दिनी जाणून घेतल्या तक्रारी

0

जळगाव। जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनासाठी उपस्थित असणार्‍यांनी एक वेगळाच अनुभव घेतला. महिला लोकशाही दिनात आपली गार्‍हाणी घेऊन आलेल्या महिलांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या शेजारच्या खुर्चीवर सन्मानाने बसवून त्यांचेकडून त्यांच्या गार्‍हाणी, समस्या आस्थेवाईकपणे जाणून घेतल्या.

महिला लोकशाही दिनात 28 तक्रार अर्ज आले असून 25 अर्ज जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था, 1 बालविकास प्रकल्प अधिकारी, 1 प्रांत फैजपूर तर 1 शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे विभागाशी संबंधित होता.