महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ

0

हिंजवडी : रस्त्यामध्ये कार थांबवल्याबाबत महिला वाहतूक पोलिसांनी चालकाला कार पुढे किंवा मागे घेण्यास सांगितले. त्यावरून चिडलेल्या कार चालकाने गाववाला असल्याचे सांगत अश्‍लील शिवीगाळ करून भर रस्त्यात हुज्जत घातली. हा प्रकार सोमवारी हिंजवडी-वाकड रस्त्यावर घडला. याप्रकरणी महिला कर्मचार्‍याने फिर्याद दिली. त्यानुसार सागर निवृत्ती शितोळे (वय 32) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कर्मचारी हिंजवडी-वाकड रस्त्यावर रात्री इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या पंक्चरजवळ वाहतूक नियंत्रणाचे काम करत होत्या. त्यावेळी सागर त्याच्या स्कोडा कार (एमएच 14/जीएन 0090) मधून जात होता. त्याने पेट्रोल पंपासमोरील पंक्चरसमोर कार थांबवली. त्यामुळे फिर्यादी यांनी सागरला कार पुढे किंवा मागे घेण्यास सांगितले. त्यावरून त्याने अश्‍लिल शिवीगाळ करून हुज्जत घातली.