शेंदुर्णी। महिला सक्षमिकरणात महिला पतसंस्थांची भुमिका महत्वाचे असल्याचे अ.र.भा. गरुड महाविद्यालयातील वाणिज्य विभागप्रमुख प्रा.श्याम जीवन साळुंखे यांच्या पीएचडी संशोधनातुन सिध्द झाले आहे. महिला सक्षमिकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी अर्थव्यवस्थेत कार्य करणार्या खान्देशातील महिला सहकारी पतसंस्थांच्या कामगिरीवर आधारित अध्ययन हा त्यांचा पीएच.डी. संशोधन प्रबंध होता. त्यांच्या संधोधन प्रबंधाचा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्विकार केला आहे. उमविचे मा.कुलगुरु प्रा.डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते त्यांना कॉमर्स अँड बिझनेस लॉ या शाखेची पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.
कॉमर्स अँड बिझनेस लॉ या शाखेची पीएच.डी.
प्रा.साळुंखे यांनी आपल्या संशोधनातून खान्देशातील महिलांनी स्वःनेतृत्वाखाली स्थापन केलेल्या महिलांच्या कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सक्षमीकरीता कार्य करणार्या आणि महिलांचे नेतृत्व अधोरेखीत करणार्या पतसंस्थांच्या सामाजिक व आर्थिक कामगिरीचे अध्ययन संशोधनाच्या माध्यमातून केले. त्यांना प्रा.डॉ.मिनाक्षी वायकोळे यांनी मार्गदर्शन केले. भुसावळ नाहाटा महाविद्यालयाने संशोधन साहित्य संदर्भ उपलब्ध करुन देवून डॉ.अरविंद चौधरी यांनी सहकार्य केले. त्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष संजय गरुड, सचिव दीपक गरुड, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, सर्व संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.