महिला सबलीकरणांतर्गत ‘स्टार्ट अप इंडिया‘

0

शहरात पहिला संयुक्त उपक्रम

पिंपरी-चिंचवड : केंद्र शासनाच्या स्टार्ट अप इंडिया धोरणाची अंमलबजावणी आणि महिला सबलीकरणासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील दोन महिलांनी औद्योगिक, सेवाक्षेत्र, वाणिज्य क्षेत्रासाठी लेखापरीक्षण तसेच सल्ला देण्याच्या उपक्रमास नुकतीच सुरुवात झाली.

चिंचवड येथील चैतन्य सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकांउंटट्स वेस्टर्न इंडिया रिजन उपाध्यक्ष एल.डी. पवार होते. यावेळी पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, अ‍ॅड. आप्पासाहेब शिंदे, रंगनाथ गोडगे पाटील, आर. डी. कुटे, आर. के. शिंदे उपस्थित होते. सोनाली शिंदे व स्नेहल शिंदे यांनी हा उपक्रम राबविला आहे. संदीप बेलसरे म्हणाले की, एमआयडीसी व परिसरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना करसल्लागार, सीए आणि कॉस्ट अकाउंटट असा सामूहिक सेवा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. हा उपक्रम व्यवसायवाढीसाठी उपयुक्त आहे. मनोज शर्मा म्हणाले की, मेक इन इंडिया, मेन इन महाराष्ट्र, स्टार्ट अप इंडिया आणि जुन्या कर्जाचे कमी व्याजदराने रुपांतर अशा इज ऑफ डुयिंग बिझनेस या पंतप्रधानांच्या संकल्पना पूर्तीसाठी कटिबद्ध आहोत, असे शर्मा यांनी सांगितले.