महिला सहकारी मंडळाची 9 ऑगस्टला वार्षिक सभा

0

जळगाव । येथील महिला सहकारी मंडळाची 71 वी वार्षिक सर्व साधारण सभा बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2017 रोजी घेण्यात येत आहे.

सहकार तत्वावर चालणारी जळगाव जिल्हयातील महिला सहकारी मंडळ ही महिलांची संस्था आहे. या संस्थेव्दारे अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. येत्या बुधवार दिनांक 9 ऑगष्ट रोजी ,सकाळी 10.30 वाजता गायत्री मंदिर विसनजी नगर येथे संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. सभेत विषयपत्रिकेनुसार गतवर्षीचा अहवाल येत्या वर्षातील नफातोटा पत्रक, जमाखर्च पुढील वर्षाचे अंदाज पत्रक, लेखा परिक्षकाचा अहवाल वाचन इ. विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तदनंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. सभेस संस्थेच्या सभासदांनी उपस्थित राहावे अशी विनंती सचिव सौ. शांता वाणी यांनी केली आहे.