पोलिस आयुक्तालय व्हावे, कचरा समस्या सोडवावी, पाणीपुरवठा सुरळीत करावा अशा मागण्या
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणी जाहीर
पिंपरी-चिंचवड : शहरातील अनेक मुलभूत प्रश्नांकडे पालिका प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शहर महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार (दि. 8) जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी 11 वाजता मुक आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
असे आहेत प्रश्न
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या घटनांकडे पाहिल्यास महिला सुरक्षित नसल्याचे समोर येते. शहरामध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सरकारने घोषणाही केली. परंतु, अद्याप येथे सुरू होऊ शकलेले नाही. सरकार केवळ घोषणाबाजीच करीत आहे. तसेच पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये ही कचर्याची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार शहरातील काही भागांमधून होत आहे. अशा
कार्यकारिणी खालीलप्रमाणे
शहर निरीक्षक कविता खराडे, शहर कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, संगिता आहेर पिंपरी विधानसभा अध्यक्षा वंदना पिंपळे, कार्याध्यक्षा वर्षा शेडगे, उपाध्यक्षा दिपाली देशमुख, आशा शिंदे, पल्लवी पांढरे, वर्षा झपके, शिल्पा बिडकर, सह शहर सरचिटणीस सायुजीता दोडके, चिटणीस रंजीना फ्रान्सेस, झोपडपट्टी सेल अध्याक्षा मंदाकिनी गायकवाड, चिंचवड विधानसभा अध्यक्षा – भक्ती टण्णू, उपाध्यक्षा शिला भोंडवे, राजश्री जाधव, सुप्रिया पवार, पौर्णिमा पालेकर, सरचिटणीस सुनंदा काटे, शारदा चोक्शी, सह सरचिटणीस अनिता गायकवाड, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटगळ, उपाध्यक्षा शकुंतला भाट, कविता आल्हाट, सह सरचिटणीस रोहिणी ताम्हाणे, चिटणीस संगिता गोरसे आदींची निवड जाहीर करण्यात आली. तसेच सुरेखा कोळी, डॉ. सरोज अंबिके, रुपाली गायकवाड, आशा जवळकर, निर्मला माने, दिपाली लांडे, मिरा कुदळे, कविता चव्हाण, योगिता गावडे, अपर्णा गावडे, वंदना कांबळे, अनिता सातपुते, जयश्री नढे, वैशाली बानगिरे आदींचीही निवड जाहीर करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, सुलक्षणा धर, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, शहर प्रवक्ता फजल शेख, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, संघटक विजय लोखंडे, आनंदा यादव, संघटक सचिव कविता खराडे, कार्यालयीन सचिव रामदास मोरे आदी उपस्थित होते.