महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न; पिंप्राळ्यातील घटना

0

जळगाव । माहेरी आलेल्या 20 वर्षीय विवाहितेने स्वत:च्या कपड्यांना आग लावून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र वडिलांच्या सतर्कतेने महिला बचावली असून तिला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक माहिती अशी की, राणी अशोक सोये(वय 20, रा.पिंप्राळा हुडको) या माहेरी वडिल गोविंदा उखर्डू सोनवणे यांच्या घरी गेल्या तीन दिवसांपासून आल्या होत्या. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिल गोविंदा सोनवणे यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी तातडीने मुलीला रिक्षाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या आगीत त्या 26 टक्के भाजल्या गेल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.