महिलेची पर्स हिसकावली

0

निगडी : चालत जाणार्‍या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावली. त्यामध्ये 23 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना येथे घडली. साधना संजय दातार (वय 52, रा. निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास प्राधिकरणमधील सुखशांती हॉटेल समोरील रस्त्यावरून पायी जात होत्या. अचानक पाठीमागून दुचाकीवरून एक तरुण आला. त्याने साधना यांच्या हातातील पर्स हिसकावली. पर्समध्ये 22 हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन होता. चोरट्याने एकूण 23 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चोरट्याचा रंग काळा सावळा होता, नेसणीस पांढरी पॅन्ट आणि पंधरा शर्ट घातला होता.