पाचोरा : पाचोरा तालुक्यातील 40 वर्षीय महिलेवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने महिलेला दुचाकीवर जबरीने बसवून शेतात नेत तोंडात बोळा कोंबून अत्याचार केला शिवाय नराधमाने अत्याचार केल्याचा व्हिडीओ देखील बनविला असल्याची तक्रार पीडीतेने केली आहे. या पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार
पाचोरा तालुक्यातील एका गावात 40 वर्षीय महिला तिचा भाऊ व मुलासह वास्तव्यास आहे. रविवार, 5 जून रोजी रात्री 9 वाजता महिला घरी एकटी असतांना संशयीत आरोपी आबा अंबादास कोळी (घोसला, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) हा दुचाकीवर आला. तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडतो, असे त्याने महिलेले सांगितले मात्र महिलेने नकार दिल्याने तिला शिविगाळ करण्यात आली तसेच तुझ्या भावासह मुलाला मारून टाकेल, अशी धमकी आरोपीने देत महिलेला दुचाकीवर जबरीने बसवून नेत सोयगाव शिवारातील शेतातील झाडाखाली नेत तोंडात कापडाचा बोळा कोंबून अत्याचार केला. एव्हढेच नाही तर अत्याचाराचा व्हिडीओदेखील बनविला. त्यानंतर मारहाण करून खिश्यातील भिलावा दगड फोडून त्याचे तेल नको त्या ठिकाणी लावून छळ केला. या प्रकरणी पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी आबा आंबादास कोळी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.