महिलेच्या पिशवीतून अज्ञात रुवतीने पर्स पळविली

0

शहादा । येथील बसस्थानक आवारातुन भरदुपारी बसमध्ये चढतांना महिलेच्रा पिशवीतुन पर्स काढुन अज्ञात युवती तेथुन फरार झाली. या पर्समध्ये सुमारे एक किलो सोने होते मात्र पोलीसात 85 तोळे सोने सुमारे 28 लाख रुपयाचा ऐवज, मोबाईल व पाचहजार रुपये रोख चोरीस गेले आहे. बसस्थानक आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याने तसेच बसस्थानक आवारात पोलीस बंदोबस्ताअभावी ही घटना घडल्याचे बोलले जाते.

प्रवाशांची सातत्राची मागणी
शहादा आगार ही जिल्ह्यात सर्वात जास्त प्रवाशीसंख्या नेणारे व उत्पन्न देणारे आहे. आवारात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणावरुन अनेक वेळा लहान मोठ्या चोर्‍याचे प्रमाण वाढले आहे. बसस्टँड आवारात असलेले सीसीटीव्ही कॅमेरॅचे किरकोळ रक्कम न भरल्याने गेल्या काही महिन्यापासून बंद आहे. प्रवाशांनी वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्याची मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे तसेच बस लागताना वाहक हा त्या वाहना सोबत असणे अनिवार्य असते मात्र वाहक हा कधीच रहात नाही. बसमध्ये कोण अगोदर चढले आहे उतरत आहे या घटनेकडे वाहकाचे लक्ष असले तर चोरीचा घटनाना आळा बसु शकतो . आगार प्रमुख यांनी सीसीटीव्ही कॅमेरा सुरु करावे तसेच प्रत्येक बस लावतांना वाहक हा त्याचा सोबत असावा अशी प्रवाशांची मागणी आहे .

15 ते 18 वरोगटातील रुवती
पोलीसांनी पथक नेमुन तपासाला गती दिली आहे .दुपारी बसस्थानक आवारातुन बसमध्ये चढत असतांना सुमारे 85 तोळे सोने चोरीस गेले ही घटना दुपारी 3. 30 चा सुमारास घडल्याची माहिती पोलीस निरिक्षक शुक्ल याना मिळताच त्यांनी बस स्थानकाचा घटनास्थळी धाव घेतली . पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी लागलीच तीन स्वतंत्र पथके नेमुन त्या पथकाना रवाना केले आहे . चोरीचा घटनेत पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील युवती असल्याचा अंदाज आहे.