महिलेच्या हातातून मोबाईल लांबवला : जळगावातील घटना

Dhoom style of a woman who went for a morning walk in Jalgaon extended her expensive mobile phone जळगाव : शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या मागे असलेल्या रस्त्यावर अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातून 27 हजार रुपये किंमतीचा मोबाईल धूम स्टाईल लांबवला. याबाबत शुक्रवारी रात्री 9 वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर लांबवला मोबाईल
लीना वासुदेव चौधरी (52, रा. आराधना कॉलनी, नवीन पोस्टल कॉलनी, जळगव) याआपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी पायी जात असताना मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाजवळ अज्ञात एका चोरट्याने त्यांच्या हातातील 27 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पळ काढला.

रामानंद नगर पोलिसात गुन्हा
या संदर्भात लीना चौधरी यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.